dcsimg

कटला मासा ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
कटला
माशांची प्रजाती
Catla catla.JPGमाध्यमे अपभारण करा
Wikispecies-logo.svg Wikispeciesप्रकार टॅक्सॉन IUCN conservation status सामान्य नाव
Taxonomyसाम्राज्यAnimaliaSubkingdomBilateriaInfrakingdomDeuterostomiaPhylumChordataSubphylumVertebrataInfraphylumGnathostomataMegaclassOsteichthyesSuperclassActinopterygiiClassActinopteriSubclassNeopterygiiInfraclassTeleosteiMegacohortOsteoglossocephalaiSupercohortClupeocephalaCohortOtomorphaSubcohortOstariophysiOrderCypriniformesSuperfamilyCyprinoideaFamilyCyprinidaeGenusCatlaSpeciesCatla catlaOriginal combination
Cyprinus catla
Taxon author Francis Buchanan-Hamilton, इ.स. १८२२ Edit this on Wikidata अधिकार नियंत्रण Blue pencil.svg

कटला गोड्या पाण्यात राहणारा असून भारतात सगळीकडे आढळतो. कृष्णा नदीच्या दक्षिणेस हा पूर्वी दुर्मिळ असे पण हल्ली मत्स्य-संवर्धनामुळे दक्षिणेत याचा प्रसार फार झपाट्याने होत आहे. सायप्रिनिडी कुलातील कटला वंशाचा हा मासा आहे.कार्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशांच्या समूहातील तो आहे. याचे शास्त्रीय नाव कटला कटला असे आहे. कटला हे भारतीय नाव इंग्रजी भाषेतही रूढ झालेले आहे. महाराष्ट्रात या माशाला तांबरा म्हणतात पण काही ठिकाणी कटला हे नावही प्रचारात आहे.

शरीर रचना

  • डोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रुंद व फुगीर असतो.
  • अंगावरचे खवले मोठे असतात. ओठाच्या ठेवणीवरून इतर कार्प माशांमध्ये हा सहज ओळखला जातो.
  • शरीर मजबूत असून लांबी १.८ मी. पर्यंत असते. पाठीकडचा रंग करडा आणि बाजूंचा रुपेरी असतो
  • तोंड वरच्या बाजूला वळलेले, खालचा ओठ जाड असतो. मिश्‍या नसतात.
  • पर गडद रंगाचे पण कधीकधी काळे असतात.
  • खालच्या ओठाचा काठ मऊ दातेरी नसतो. माशाचे प्रमुख खाद्य प्राणी प्लवंग वा वनस्पती प्लवंग आहे.
  • शरीरावरील खवल्यांचा केंद्रभाग गुलाबी किंवा ताम्रवर्णी असतो. पण उदरावरील खवले पांढुरके असतात.

खाद्य

तलावाच्या वरच्या थरातील अन्न खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरिता स्पर्धा करीत नाही. वाढ जलद असते.कटला हा भारतातील एक अतिशय किफायतशीर खाद्य मत्स्य आहे. ६० सेंमी. लांबीपर्यंतचे मासे खायला चविष्ट असतात. यापेक्षा जास्त लांबीच्या माशांची चव चरबट असते. ५६ सेंमी. लांबी होण्याच्या सुमारास हे मासे पक्व होतात.

वास्तव्य

भारतात सर्वत्र आढळतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा प्रजननाचा हंगाम आहे.

स्थलांतर

अंडी घालण्याकरिता ते सपाट प्रदेशातील नद्यांत स्थलांतर करतात. अंडी वाटोळी व पारदर्शक असून बुडून तळाशी जातात. १६ — १८ तासांत अंडी फुटून ४⋅४ — ५⋅३ मिमी. लांबीचे डिंभ (भ्रुणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी क्रियाशील अवस्था) बाहेर पडतात. सहा आठवड्यांत ते प्रौढरूप धारण करतात.

संदर्भ

http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/91591f93293e

http://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/92d93e93092494092f-92a94d93092e941916-91593e93094d92a-92e93e93693e90291a94d92f93e-91c93e924940-91594b92392494d92f93e-906939947924#section-1

https://www.loksatta.com/lokshivar-news/fish-farming-2-1423585/

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

कटला मासा: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

कटला गोड्या पाण्यात राहणारा असून भारतात सगळीकडे आढळतो. कृष्णा नदीच्या दक्षिणेस हा पूर्वी दुर्मिळ असे पण हल्ली मत्स्य-संवर्धनामुळे दक्षिणेत याचा प्रसार फार झपाट्याने होत आहे. सायप्रिनिडी कुलातील कटला वंशाचा हा मासा आहे.कार्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशांच्या समूहातील तो आहे. याचे शास्त्रीय नाव कटला कटला असे आहे. कटला हे भारतीय नाव इंग्रजी भाषेतही रूढ झालेले आहे. महाराष्ट्रात या माशाला तांबरा म्हणतात पण काही ठिकाणी कटला हे नावही प्रचारात आहे.

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक