dcsimg

ढगाळ बिबट्या ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

ढगाळ बिबट्या (शास्त्रीय नाव: Neofelis nebulosa, निओफेलिस नेब्युलोसा ; इंग्लिश: Clouded Leopard, क्लाउडेड लेपर्ड) हा भारताच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर राज्यातील तराईच्या जंगलात आढळणारा प्राणी आहे. याचा सर्वाधिक आढळ भूतानमध्ये आहे. ह्या प्राण्याला लामचित्ता असेही नाव आहे.

वर्णन

ढगाळ बिबट्या हा बिबट्या सदॄश दिसतो पण ठिपक्यांऐवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ब्लॉक असतात म्हणूनच याचे नाव ढगाळ बिबट्या असे पडले आहे. हा आकाराने खूपच लहान असतो व वजन जेमतेम २०-२२ किलोपर्यंत भरते. मांजरांमध्ये मार्जारकुळामध्ये सर्वात जाड शेपटी याची असते. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो व क्वचितच जमिनीवर उतरतो. त्याच्या जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते. तो पिल्लांना झाडाच्या ढोलीत वाढवतो[२].

मार्जार कुळातील मोठ्या मार्जारांमध्ये व ढगाळ बिबट्यांमध्ये कवटीची रचना व दात या दोन बाबतीत तफावत असते. ढगाळ बिबट्याचे वरचे सुळे इतर मार्जारांपेक्षा जास्त विकसित असतात.

संदर्भ व नोंदी

  1. ^ Cat Specialist Group (2002). {{{title}}}. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 11 May 2006ला बघितले. Database entry includes justification for why this species is vulnerable
  2. ^ प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडिअन अ‍ॅनिमल्स [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]] (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

ढगाळ बिबट्या: Brief Summary ( Marathi )