dcsimg

हळद्या ( Marathi )

tarjonnut wikipedia emerging languages

मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus oriolus असे आहे.

नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. मादी नरासारखीच पण किंचित फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो. झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच, आवाजावरूनच तो ओळखू येतो.

Golden Oriole.ogg हळद्याचा आवाज ऐका

फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. याचे घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थित विणलेले असते. विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढर्‍या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून करतात.

चित्रदालन

lisenssi
cc-by-sa-3.0
tekijänoikeus
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक
alkuperäinen
käy lähteessä
kumppanisivusto
wikipedia emerging languages

हळद्या: Brief Summary ( Marathi )